राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सूधीर भाऊ मुनगंटीवार यांचा कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून माजी जि.प.सदस्य अमर भाऊ बोडलावार यांचा संपर्कातून सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा हस्ते ग्राम पंचायत विहीरगाव चे सरपंचासहीत सदस्य पक्षप्रवेश केला. यावेळेस सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सौ. कल्पना संतोष मडावी सरपंच ग्राम पंचायत विहीरगाव, शितल आकाश चौधरी, सदस्य ग्रा.पं विहीरगाव, अजय लक्ष्मण कोल्हे,सदस्य ग्रा पं.विहीरगाव, संतोष हनुमंतू वाट, सदस्य ग्राम पं विहीरगाव या सर्वांचे पक्षात स्वागत केले. जनतेचा हितासाठी कार्य करण्यास आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले. व पक्षाशी एकनिष्ठ राहून चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले.
यावेळी तिथे मा. जि.प.सदस्य अमर बोडलावार, स्वप्नील अनमूलवार सदस्य ग्रा पं.धाबा, आशिष मामीडपेल्लीवार सोशल मिडीया प्रमुख, चेतन गौर, कोमल फरकडे, मनीषा मडावी, मनीषा दुर्योधन, बंडूभाऊ बोनगीरवार सूहास माडूरवार आदि उपस्थित होते.