डॅनिएल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोसरी:- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंच आयोजित दिनांक २५ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत गावजत्रा मैदान भोसरी येथे आयोजन करण्यात आले आहे. या “इंद्रायणीथडी २०२३” या उपक्रमाला विविध स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
महिला सक्षमीकरण व सबलीकरण ,उद्योजकता विकास, नवदितांना संधी या हेतूने इंद्रायणी थडी 2023 या महोत्सवाचे आयोजन केले आहे अल्पावधीतच या महोत्सवाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे ही निश्चित समाधान कारक आहे खरं तर २०१९ पासून इंद्रायणी थोडी महोत्सव भरवला जातो मात्र कोविडच्या महामारी मुळे दोन वर्ष हा महोत्सव करता आला नाही यावर्षी पुन्हा नव्या उत्साहाने शिवांजली सखी मंच अनेक स्वयंसेवी संस्था संघटना व स्वयंसेवकाच्या पुढाकाराने पुणे पिंपरी चिंचवड सह ग्रामीण भागातील आबाल वृद्धांसाठी भरगच्च कार्यक्रमाची पर्वणी घेऊन आला आहे.
भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर सुमारे 17 एकर जागेत हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून एक हजाराहून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहे शेकडो महिला बचत गट महिला संस्था, स्वयंसेवी संस्थाचा या जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रतील महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकना प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांनी आवर्जून या महोत्सवाला भेट दिली आणि विविध कार्यक्रम उपक्रम आणि उत्पादन खरेदीचा आनंद लुटला. पिंपरी चिंचवड चा इतिहासात उच्चांक गर्दीचा पहिलाच कार्यक्रम “इंद्रायणी थडी २०२३” आतापर्यंत सुमारे वीस लाखाहून अधिक प्रेक्षकांची भेट, 150 हून अधिक ऍक्टिव्हिटीचे नागरिकांना आकर्षण २८ जानेवारी दुपारी चार वाजेपर्यंत साडेतीन कोटीहून अधिक उलाढाल.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्तानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी, महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव राक्षे, सौ. चित्राताई वाघ, पैलवान सिकंदर शेख, इरफान भाई सय्यद अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच अनेक मान्यवरानी या महोत्सवाला भेट दिली. काही जर्मन पर्यटकांनी देखील या महोत्सवाला भेट दिली.
या म्होत्सवचा समारोप माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमुळे बचत बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांना नवीन ऊर्जा प्रेरणा मिळेल अशी आशा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.