प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रेच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्षा विद्याताई चौहान यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जनजागरण यात्रा येत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस हिंगणघाट शहर व तालुक्याचा वतीने बैठकीचे आयोजन विधानसभा अध्यक्ष निताताई गजबे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्षा डॉ.सुरेखाताई देशमुख या होत्या. या बैठकीत जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, सीएनजी दरवाढ बेरोजगारी तसेच महिला भगिणीवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्यांवर राष्ट्रवादी जनजागरण यात्रेच्या निमित्ताने चर्चा करण्यात आली.
या बैठकीला विभागीय अध्यक्षा डॉ.सुरेखाताई देशमुख, विधानसभा अध्यक्ष निताताई गजबे, जिल्हा उपाध्यक्ष कविताताई मुंगले, जिल्हा सरचिटणीस कविताताई वानखेडे, जिल्हा सचिव भारतीताई घुंगरूड, जिल्हा सरचिटणीस सुजाताताई जांभुळकर, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख,तालुका उपाध्यक्ष मिनाक्षीताई ढाकणे, शहराध्यक्ष मृणालताई रिठे, शहर उपाध्यक्ष रजनीताई महाकाळे, दिपालीताई रंगारी, वैशालीताई जगताप, सुनीताताई बानमारे, सुलोचनाताई भगत, शिल्पाताई ठाकरे, अमृताताई दारूनकर, भावनाताई समर्थ, नंदाताई समर्थ, प्रेमिलाताई शेळके, अल्काताई बुरडकर, सविताताई गिरी, वेणूताई निमजे, लताताई सुकळकर, कल्पनाताई राऊत यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

