✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1:- राज्यामध्ये महाऊर्जामार्फत नवीन व नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा संवर्धनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना वेस्ट टू एनर्जी, बायोमास, बायोगॅस कार्यक्रम राबवायचे असल्यास त्यांनी प्रस्ताव सादर करण्या चे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी राज्यासाठी वेस्ट टू एनर्जी कार्यक्रम 600 कोटी रुपये, बायोमास कार्यक्रम 158 कोटी रुपये व बायोगॅस कार्यक्रमासाठी 100 कोटी रुपये असे 858 कोटी रुपयाची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. ग्लासगो येथील कराराच्या मानकानुसार 50 टक्के इतकी ऊर्जा सन 2030 पर्यंत अजीवाश्म इंधन स्त्रोतापासून निर्माण करण्यास कटीबध्दता दर्शविली आहे. या सर्व बाबी विचारात घेता राज्यात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आस्थापित होऊन देशात अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात देशात राज्य अव्वल स्थानावर येण्यासाठी यातील उपलब्ध अनुदानाचा वापर जास्तीत जास्त करावा.
इच्छुकांना http://biogas.mnre.gov.in किंवा www.biourja.mnre.gov.in या पोर्टलचा वापर करुन प्रस्ताव सादर करता येतील. सदर योजनेशी संबंधित माहिती करीता महाऊर्जा जिल्हा कार्यालय, 32/14 लहानुजी नगर, सेंट अँथोनी शाळेसमोर, मुख्य पोष्ट ऑफिस जवळ, वर्धा येथे संपर्क साधावा असे महाऊर्जा कार्यालयाने कळविले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348