अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-02 फेब्रुवारी:- येथील एल आय सी कार्यालयात मागील वर्षी उत्कृष्ट व शतकविर झालेल्या अभिकर्त्यांचा लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (लियाफी) वतीने २४ जानेवारी या अभिकर्ता व्यवसाय संरक्षण दिनी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला लियाफी सावनेर शाखा अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, शाखा व्यवस्थापक किशोर सहारे, सेवक ढोले, माधव महल्ले उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून झाली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित शेकडो अभिकर्त्यांना पाहुण्यांनी विमा व्यवसाय, बाजारात होत असलेले बदल, अभिकर्ता यांच्यासाठी लियाफी तर्फे होत असलेल्या मागणी संबंधित व विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सावनेर शाखेमध्ये मागील वर्षी 9 अभिकर्ता MDRD साठी पात्र झाले तर 31 अभिकर्ता शतकविर झाले होते. या यशस्वी अभिकर्त्यांचा सत्कार स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारेश्वर निंबाळकर, मंच संचालन ढवल डुमरे, तर आभार प्रदर्शन रितेश सुर्यवंशी यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

