शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम, दि.9:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत यांची उपकंपनी महाप्रती महात्मा फुले रिन्युवेबल एनर्जी ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी मार्फत जिल्हयातील अनुसूचित जातीच्या किमान 500 पात्र लाभार्थ्यांना पर्यावरणपुरक निर्धूर चूली वितरणाकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी https://maha-diwa.vercel.app या लिंकवर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करावे. असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.