✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील वणी येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला विद्यार्थ्याच्या पालकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वणी येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये कार्यरत असणारे शिक्षक चंद्रशेखर शिवणकर यांना एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळेल येऊन विचारले की माझ्या मुलीच्या नावामध्ये बदल करायला उशीर का होत आहे. यावेळी शिक्षक चंद्रशेखर शिवणकर यांनी सांगीतले की, जरूरी असलेले कागदपत्र नसल्यामुळे मी नियमाबाहेर जाऊन मी तुमच्या मुलीच्या नावामध्ये बदल करू शकत नाही. हे आयकताच पालक सुशांक विनायक सालवे रा. वणी (छोटी) यांनी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असण्यारा शिकक्षकाला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारची तक्रार शिक्षकांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हिंगणघाट पोलीसानी घटनास्थळी जाऊन या घटनेचा तपास करून आरोपी पालक सुशांत विनायक सालवे यांच्यावर गुन्हा दाखल करून याच्यावर कार्यवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

