पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विकास मरगळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की कोंढवा परिसरात घरफोडी करणारा आरोपी हा सोमजी चौक येथे थांबलेला आहे सदर बातमीच्या अनुषंगाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इमरान बाबू शेख वय 37 वर्ष राहणार लक्ष्मी नगर लेन नंबर 5 बालाजी किराणा स्टोअर जवळ कोंढवा पुणे असे सांगितले त्याच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने खालील गुन्हे केलेचे कबूल केल्याने खालील गुन्हे उघड झालेले आहे.
कोंढवा पो.स्टे.
1.गुन्हा रजिस्टर नंबर 128/2022 भादवी.क.380
2.68/23 भा.द. वि. कलम 454,457,380
सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीस तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही स. पो. नि. अनिल सुरवसे पो. हवा. अमोल हिरवे पो.हवा वाघमारे पो. अंमलदार गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, राहुल रासगे, सुहास मोरे, जयदेव भोसले, विकास मरगळे, यांनी केली आहे.
आदरपूर्वक सादर.