✒️राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरी येथून शिकवणी घेणाऱ्या एका मौलाना शिक्षकाने दोन चिमुकेल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना जोगेश्वरी येथे उघडकीस आली आहे. ही घटना समोर येतात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये आरोपी मौलानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपी मौलानाला अटक केली आहे.
या मुलांच्या पालकांनी पीडित मुलांना अरबी आणि उर्दू शिकवणी लावली होती. या शिकवणीसाठी सदर 25 वर्षीय शिक्षक 4 डिसेंबर 2022 पासून त्यांच्या घरी येत होता. शिकवणी दरम्यान दिवाणखाण्यात कुणी नसल्याचे पाहून आरोपी मौलानाने 4 वर्षीय मुलगा आणि 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
या मुलावर अत्याचार झाल्याची माहिती पीडित मुलांनी याबाबत आपल्या आईला माहिती दिली. पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आरोपी 4 डिसेंबर, 2022 पासून पीडित मुलांना अरबी आणि उर्दू भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. त्यावेळी दिवाणखान्यात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांसोबत अश्लील कृत्य करत होता. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला राहत्या परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली.

