राष्ट्रीय सरचिटणीस सौ आशाताई गवळी ह्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शाखेचे उद्घाटन.
नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आमदार अरुणभाई गवळी ह्यांच्या आशीर्वादाने व राष्ट्रीय सरचिटणीस सौ आशाताई गवळी ह्यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हाध्यक्ष शनी शिंगारे ह्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील पदाधिकारयांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यकर्ता मेळावा पार पडला तसेच पुणे जिल्हयातील इयोन आयटी पार्क, खराडी शाखा, सूंदराबाई चोक, चंदननगर शाखा, सनसिटी चौक, वडगावशेरी शाखा, वडगावशेरी गावठाण, शाखा, ग्रीन सीटी, सातव नगर,हडपसर, रीक्षा स्टॅन्ड, साठे नगर,हडपसर, कार्यालय ऊद्घाटन, वैदूवाडी, हडपसर कार्यालय ऊद्घाटन, पक्ष कार्यकर्ता मेळावा, आंबेडकर सांस्कृतिक भवन, रामटेकडी ह्या सर्व आयोजीत केलेल्या कार्यक्रमांच्या शाखांचे व कार्यालयाचे उद्घाटन काल आशाताई गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांना आशाताई गवळी यांनी मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला.
अखिल भारतीय सेना म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे अखिल भारतीय सेना हे समीकरण आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायचे आहे. त्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी जनतेचे प्रश्न सोडवु शकतो हा विश्वास असल्यामुळेच नागरिक पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही असे आश्वासन आपण सर्वांना द्या.
संपूर्ण समाजकारण हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम सुरू आहे, त्यामुळेच आज इतका प्रचंड प्रतिसाद सर्व स्तरांतून मिळत आहे. याचेच उदाहरण म्हणजे आजची ही गर्दी मोठ्या उत्साहाने या पक्ष मेळाव्यात सहभागी झाली आहे. अशीच साथ सदैव राहिली तर निश्चितच सर्वांगीण जनतेची कामे पुर्ण होण्यास जास्त काळ लागणार नाही. सर्वांनी एकत्र काम करून, जोमाने काम करून पक्ष मजबुत करायचा आहे. पुणे जिल्ह्यात अखिल भारतीय सेना पक्ष चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना संकटकाळात मनापासून जनतेची मदत केली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक व यापुढेही जनतेच्या मदतीसाठी तत्पर रहा.” असे यावेळी आशाताई गवळी यांनी सांगितले.
“सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटुन काम केले पाहिजे. पक्षावर व अरुण गवळी यांच्यावर सर्व जनतेचा विश्वास वाढत आहे. अनेकजण पक्ष प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम केले पाहिजे. आगामी निवडणूका जिंकण्यासाठी लढा.” असा निर्धार सर्वांनी करा. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे व अरुण गवळी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवुन आपण पक्ष संघटना अजुन बळकट करण्याचा प्रयत्न कराल, असा विश्वास बाळगते. यावेळी आशाताई गवळी यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या पदाधिकांर्यांचे आभार मानले.
यावेळी मयूरीताई बामने, धीरजभाऊ सातव, फीरदोस ताई शेख, नवनाथ शिवले, वीनीत चौधरी, संजय येडगे सह हजारो महिलां आणि पुरुषाची उपस्थिती होती.

