नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त पोलिस बांधवांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनेक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांचा कायम मला आदर वाटतो असे सांगत पोलीस बांधवांच्या याच कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नौपाडा येथील पोलिस बांधवांना गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून पोलीस बांधवांशी संवाद साधला.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

