- फरार असलेले दोन्ही आरोपी गजाआळ.
- राजुरा वन विभागाने सापडा रचून केली कारवाई.
- चितळ शिकार प्रकरणी तीन आरोपी.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 5 फेब्रु:- मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 167 मध्ये तार फासे लावून चितळाची शिकार करून मासाची विल्हेवाट लावत असताना वनकर्मचार्यानी धाड टाकून तुलाना येथील वडगू काशिनाथ टेकाम या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेतले तर इतर दोन आरोपी फरार झाले होते या दोन्ही फरार आरोपीना वनविभाग राजुराने सापडा रचून दि.4 फेब्रुवारी ला दुपारी दोनवाजताच्या दरम्यान राजुरा बसस्थानक येथून ताब्यात घेतल्याने आता आरोपीची संख्या तीन झाली आहे.
चिंतळाच्या मांसाचे तुकडे करून विल्हेवाट लावत असल्याची माहिती वनकर्मचार्याना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी धाड टाकले असता तुलाना गावातील वडगू टेकाम यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. परंतु यात सहभागी असलेले इतर दोन फरार आरोपी शेखर चुळामन चांदेकर व गणेश शामराव टेकाम दोन्ही राहणार तुलाना यांना मोठया शिताफिने ताब्यात घेण्यात आले व दोन्ही आरोपीना घटनास्थळी नेऊन या शिकार प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी आरोपी कडून मोक्यावरून 8 किलो चितळाचे मांस, चामडे, 21 नग तार फासे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीना पकडण्यात टेंबुरवाही ग्राम पंचायतचे सरपंच रामकृष्ण कर्नूजी मडावी यांचे महत्वपूर्ण भूमिका व सहकार्य मिळाले.
ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक, श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात, परिवेक्षाधीन सहाय्यक वनसंरक्षक शेख तौफिक शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा सुरेश येलकेवाड यांचे नेतृत्वात, क्षेत्रसहायक संतोष संगमवार, प्रकाश मत्ते, नरेंद्र देशकर, वनरक्षक अर्जुन पोले, वर्षा वाघ, सायस हाके, एस. डी. सुरवसे, सुनील गजलवार, मीरा राठोड, डी.एम. चंदेल, सुनील मेश्राम यांनी केली.तसेच वनमजूर यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. पुढील तपास वनविभाग राजुरा कडून सुरू आहे. राजुरा वनविभागाच्या या धडक कार्यवाहीमुळे शिकार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

