✒️महाराष्ट्र संदेश न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बिहार:- मधेपुरा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शैतनी मुलाने आपल्याच जन्मदात्या आई जीवाने मारलं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका शैतानी मुलाने आपल्या पत्नीच्या मदतीने धारदार हत्याराने आपल्याच जन्मदात्या आईचा गळा कापून हत्या केली. यापूर्वी 2011 मध्ये आरोपीने आपल्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारलं होत. ही घटना मधेपुरा क्षेत्रातील मुरलीगंजच्या रहटा गावात घडली. चिरैया देवी असं मृतक महिलेचं नाव आहे. या हत्येचा आरोप चिरैया देवीचा छोटा मुलगा संतोष यादव यांच्यावर लागला.
आरोपी संतोष यादवचे लग्न 2007 मध्ये त्याच्या वडिलांनी रीतिरिवाजाने करून दिले. परंतु, लग्नानंतर तो समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने 2008 मध्ये त्याने दुसरे लग्न स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर संतोषची पहिली पत्नी त्याच्या वडिलांजवळ राहत होती. वडील सरकारी नोकरीत होते ती नौकरी मिळावी म्हणून यामुळं नाराज मुलाने 2011 मध्ये पेट्रोल ओतून आपल्या वडिलांना जीवंत जाळले.
संतोषने आपल्या वडिलांच्या हत्येनंतर अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरीसाठी पत्नीसोबत कट रचून आईलाही संपविले. आईचा खून करताना संतोषच्या मोठ्या भावाने पाहिले. तेव्हा संतोषने त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर मोठा भाऊ आपल्या मुलांसह गेला. तेव्हा संतोष पत्नीसह मागच्या रस्त्याने पळाला. संतोषच्या मोठ्या मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्यार जप्त केला.
संपत्तीसाठी आईची हत्या
संतोषने आपली पत्नी रुबी देवीसह मिळून दहा वर्षांपासून संपत्ती हडप करण्यासाठी प्रयत्न करत होता. आरोपीने काका आणि मोठ्या भावावर खोटे आरोप लावले.

