नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवात उपस्थित राहून आई भराडी देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
कोकणातील माणसाचे आराध्य दैवत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेत सहभागी होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. देश आणि राज्यावर अरिष्टाचे सावट ही येऊ नये, राज्यातील बळीराजाला समृद्ध कर, सर्व सामान्यांना सुखी समाधानी ठेव. अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई भराडी देवीच्या चरणी केली आहे.
याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून आई भराडी देवीच्या दर्शनासाठी बहुसंख्येने जमलेल्या भक्तगणांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वार्थाने प्रयत्नशील असून त्यासाठी कोकण नियोजन प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई सागरी मार्गाचे काम देखील लवकरच हाती घेऊन कोकणातील नागरिकांना दिलासा देऊ असेही यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळमकर, बाळासाहेबांचे शिवसेना आणि भाजप पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि आई भराडी देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

