युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जील्हातील नरखेड व काटोल तालुका येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतिने नुकताच मेळावा व तालुक्याची कार्यकारणी निवडीकरिता कलावंताची मीटिंग घेण्यात आली. याप्रसंगी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे आदरणीय मनीष भिवगडे. कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, जिल्हा अध्यक्ष दयाल कांबळे, जिल्हा सरचिटणीस अरून वाहने महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी युवराज मेश्राम हे हजर होते. सर्वप्रथम शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. व सर्व थोरपुरुष संतांचा जयजयकार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष भिवगडे, अलंकारजी टेंभुर्णे दयाल कांबळे, अरुण वाहने यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय स्वागत गीताने करण्यात आली.
नरखेड तालुका अध्यक्षपदी पुरुषोत्तमजी डांगोरे, उपाध्यक्ष रुपराज अरसडे, सचिव सुधाकरजी मुळेकर, कार्याध्यक्ष सुरेश भिसे, सहसचिव वासुदेव गौरखेडे, कोषाध्यक्ष सुखदेव हनवते, महामंत्री सुधाकर खजुरिया, संघटक नथुजी नागमोते, सहसंघटक किशोर महंत, प्रसिद्धी प्रमुख सुनील बोंद्रे, प्रचारक रामकृष्ण धुर्वे, सहप्रचारक अर्जुन शिंदे, सदस्य अशोक महंत, दादाराव चणकापुरे, श्रावण क्षीरसागर, रमेश तागडे, दिलीप तागडे, रामकृष्ण युवनाते, गंगाधर कुकडे, सुभाष देशमुख, प्रभाकर नागमोते, मधुकर धानोरकर, रामभाऊ रेवतकर, मधुकर बालपांडे, शंकर युवनाते , बिजाराम धुर्वे, हरिभाऊ धुर्वे, अजाबराव उईके, चंपतराव ढोणे, मोरेश्वर मुळेकर, धनराज खंडारे, महिला प्रतिनिधी अरुणाताई मुळेकर, निर्मलाताई सयाम, मायाताई गौरखेडे १यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे, कार्याध्यक्षअलंकार टेंभुर्णे, जिल्हाध्यक्षदयाल कांबळे यांनी प्रदान केले. त्याचप्रमाणे काटोल तालुका अध्यक्षपदीशाहीर ज्ञानेश्वर तायडे यांची एक मताने निवड करण्यात आली.

