संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद च्या माध्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिल्हा अभियानांतर्गत पंचायत समिती जिवती येथे राणी हिराई ग्रामीण क्राप शॉप चे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यामाध्यमातून जिवती तालुक्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या लघु उद्योगांना चालना देणे व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अशा प्रकारचे ग्रामीण क्रॉप शॉप उपयुक्त ठरेल, शेतीमधून निर्माण झालेल्या लोकोपयोगी वस्तूची विक्री करणे सोपे होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या शाॅप चा आर्थिक आधार होईल असे मत आ. धोटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी गट विकास अधिकारी डॉ. भागवत रेजीवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला तालुकाध्यक्ष नंदाताई मुसाने, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, संजीवनी शेवाळे, जिजाबाई सावरगाव, कांताताई क्षीरसागर, मनीषा लांडगे, गीतांजली रानफोळे, वैशाली ब्राह्मणे, सुरेखा खडागणे,रेखा भुत्ते, सावित्री राठोड, प्रियांका काळे, संगीता काळे, चांदणी शेख यासह बचत गटाच्या महिला उपस्थीत होत्या.