Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा, भाजपाच्या प्रयत्नांना यश, पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मानले आभार

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 6, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा, भाजपाच्या प्रयत्नांना यश, पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मानले आभार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आहेत.

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती. राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती. मुंबई-ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये पहिल्यांदा रेल्वे गाडी धावली होती त्यामुळे ठाणे स्थानकालाही ऐतिहासिक दर्जा आहे या रेल्वे स्टेशनच्या विमानतळाच्या धर्तीवर विकासामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होईल.

ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत निविदा प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होईल.

शहराच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध : निरंजन डावखरे
ठाणे शहराच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध असून, ठाणे रेल्वे स्थानकाप्रमाणे नवीन ठाणे स्टेशनच्या कामासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाणे शहराला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचेही डावखरे यांनी नमूद केले.

Previous Post

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या क्रॉप शॉपचे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

सराईत वाहन चोरास युनिट ४ ने केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सराईत वाहन चोरास युनिट ४ ने केले जेरबंद

सराईत वाहन चोरास युनिट ४ ने केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In