🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
हिंगणघाट :- अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी ९ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १५ वर्षीय पीडितेशी आरोपी रजत लक्ष्मीकांत कांबळे वय १९ वर्ष याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले याची संधी साधून आरोपी रजत याने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले. तसेच तु जर ही बाब कुणाला सांगितली तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी रजत कांबळे याच्याविरुद्ध विविध कलमा नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.