नितेश पत्रकार, तालुका प्रतिनिधी वणी
मो. नं. 7620029220
वणी:- तालुक्यातील पिल्की वाढोणा येथे आज रोजी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा महामानव जननायक बिरसा मुंडा यांच्या विचारावर कार्य करणारे तसेच गावातील तमाम आदिवासी समाज बंधू भगिनी कडून क्रांतिकारी बिरसा मुंडा व यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झेंडा वंदन करून जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
आज दिनांक ०९/८/२०२२ रोजी सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणात पाडल्या गेला. मोठ्या शहरातून तर गाव खेड्या पर्यंत याचा उत्सव साजरा करण्यात आला. हाच उत्सव मौजा-पिल्की वाढोणा येथे पन आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून.आपल्या आदिवासी प्रेरणाच्या प्रतिमेला हारार्पन करुन जागतिक आदिवासी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ नथ्थुजी डोनेकर साहेब, गजानन नैताम,दशरथ जुमनाके, अमोल डोनेकर, महेश डी.जुमनाके, गणपत आत्राम, निर्मला डोनेकर, प्रभावती जुमनाके, गिता पेंदोर, ललिता डोनेकर, पुजा डोनेकर, पल्लवी जुमनाके, दोलत करपते,तथा समस्त आदिवासी बांधव जागतिक दिनाला उपस्थित होते.