✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चॉकलेट डे विशेष:- फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाइन सप्ताह युवा तरुण तरुणी पासून ते वृद्ध जोडपे पण आनंदात साजरा करतात. हा महिना प्रत्येक प्रियकरा साठी खास असतो कारण या महिन्यात प्रेमाचा हँगओव्हर इतर महिन्यांपेक्षा जास्त असतो. व्हॅलेंटाईन वीकमुळे हे घडते. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या प्रेम सप्ताहात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
सर्वात जास्त गोड आहे चॉकलेट, पण त्याहून गोड आहेस तू आणि त्याहून मधूर आहे तुझी आणि माझी मैत्री… Happy Chocolate Day
७ फेब्रुवारीपासून या आठवड्यातील प्रत्येक दिवस प्रेमाच्या विविध रूपांना समर्पित आहे. या दरम्यान प्रेमी युगुल एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रेमाची कबुली देतात. रोझ डे, प्रपोज डे नंतर आता चॉकलेट डे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची कबुली कशी देऊ शकता किंवा तुमचे प्रेमसंबंध आणखी मजबूत कसे करू शकता.
न सांगता साथ देशील का, वचन दे मैत्री निभावशील का, रोज आठवण नाही काढलीस तरी चालेल पण एकट्याने चॉकलेट खाताना तुला माझी आठवण येईल का… Happy Chocolate Day
व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ‘चॉकलेट डे” मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. प्रेमाच्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, लोक आपल्या प्रियजनांना चॉकलेट भेट देतात. तसेच, या दिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले ऋणानुबंध अजून मजबूत करून नात्यात गोडवा निर्माण करू शकतात.
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा, आयुष्याचे मधुर गीत गात रहा, नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी, चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा…. Happy Chocolate Day
नात्यात गोडवा निर्माण करणारा ‘चॉकलेट डे”
या जगात अस कोण असेल ज्याला चॉकलेट आवडत याच नाही असच येणार. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खायची आवड आहे. त्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी चॉकलेट हे आजच्या “चॉकलेट डे” च्या दिवशी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा, आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा, कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही, तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझ्या सबोत रहा…Happy Chocolate Day
सध्या जगभरात ‘व्हॅलेंटाईन वीक’ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’चा आजचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. ‘चॉकलेट डे’ च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. आपल्या मनातील प्रेमाला व्यक्त करून तुम्ही जीवनातील प्रेममय वातावरणातील रथाचे सारथी होऊ शकतात.
चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर…
चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मत एका संशोधनातून समोर आल आहे. आणि हेच चॉकलेट आपल्या आवडत्या व्यक्तीच्या गालावर स्मित हास्य निर्माण करण्यासाठी पण फायदेशीर होऊ शकते.
चॉकलेटचे प्रकार आणि फायदे..
चॉकलेटचे आज विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहे. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात. तसेच चॉकलेटमध्ये कोको बीन असते. कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते. यामुळे पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते. तसेच चॉकलेट डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात. चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन असते, जे तुमचं मन प्रसन्न करते. मानसिक स्वास्थ देखील चॉकलेट खाल्ल्यानं चांगले राहते. हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो. चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशाली ठरतं.
चॉकलेट खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानं वजन देखील कमी होतं, असं कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनामुळे स्पष्ट झालं.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने होणारे फायदे ….. उच्च रक्तदाब किती धोकादायक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, या आजारात डार्क चॉकलेट फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट बीपी कमी ठेवते हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.. डार्क चॉकलेट रक्त प्रवाह सुधारते ज्यामुळे शरीरात योग्य ऑक्सिजन पोहोचतो. डार्क चॉकलेटमुळे हृदयाचे आजार कमी होतात, असेही काही संशोधनातून समोर आले आहे..
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348