पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत दि. ०६/०२/२०२३ रोजी रात्री. ११/३० वा. चे दरम्यान भापकर पेट्रोल पंप पुणे सातारा रोड, पुणे येथे फिर्यादी मधुकर राजु दांडेकर व त्याचा भाऊ किरण राजु दांडेकर इतर दोघे असे रिक्षात गॅस भरणेसाठी आले होते. त्यावेळी रिक्षाचा एक दुचाकी स्वारास धक्का लागल्याने त्या दुचाकीवरील दोघांनी रिक्षामधील फिर्यादी व त्याचा भाऊ यांना लाथा-बुक्कयांनी मारहाण करुन किरण राजु दांडेकर याचे छातीवर लाथ घालुन जागेवरच खुन केला व ते दोघे पळुन गेले. असल्याने त्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ४४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे दोन अज्ञात इसमांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरीक्षक विजय खोमणे (गुन्हे) यांनी तात्काळ तपास पथकांच्या दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणेबाबत दिलेल्या सुचनेनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे य त्यांचा स्टाफ असे दाखल गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस नाईक प्रकाश मरगजे व पोलीस शिपाई किशोर वळे हे भापकर पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्हि. फुटेज चेक करीत असताना त्यामध्ये दुचाकी स्वराचे गाडीचा नंबर व्यवस्थीत दिसत नसल्याने पेट्रोल पंपावरील वॉचमेन याने गाडीच्या शेवटच्या ५८८९ असे चार डिजीट सांगितले त्यावरुन गाडीचे मुळ नंबरचा पोलीस नाईक प्रकाश मरगजे व पोलीस शिपाई किशोर वळे यांनी शोध लावला.
तसेच यातील गाडी मालक याने सदरची गाडी कोंढवा येथे दिल्याचे सांगिल्याने कोंढवा येथे जावुन सापळा रचुन यातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून सापळा रचुन दोन्ही आरोपीस गाडीसह कौशल्याने ताब्यात घेण्यात आले. त्यांचे नाव व पत्ता १) अरबाज मेहबूब शेख वय २५ वर्षे, रा. रुम नंबर ३०४ अमिना टॉवर्स बिल्डींग गुरुनानक नगर एस.आर.ए. स्कीम, भवानी पेठ, पुणे २) मुखीम गफूर शेख वय २३ वर्षे, रा. रुम नं. २ गल्ली नं. ३१ मिठानगर मक्का मस्जिदजवळ कोंढवा, पुणे असे सांगितले व त्याचेकडे तपास करता त्यानी गुन्हा केल्याचे कबुल केले म्हणुन त्यांना दत्तवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ४४/२०२३ भा.द.वि कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ मध्ये अटक करण्यात आली असुन गुन्हयांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. राजेद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त सो परि ३ मा सुहैल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग राजेंद्र गोलाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो अं प्रकाश मरगजे, किशोर बळे, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, अमित विव्हे, सदाम शेख, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, नवनाथ भोसले व ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.