राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर/पोंभूर्णा:- रात्री झोपेत १:३० वाजताच्या दरम्यान जुनगाव येथील ईश्वर शामराव ठाकूर वय ३० वर्ष या तरुणास कुठल्यातरी विषारी स्वापदाने दंश केला. उंदीर असावा असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. मात्र नदीला पूर असल्यामुळे गाव सोडून बाहेर कुठेही निघता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करत दिवस निघण्याची वाट बघितली. दिवस उजाडताच 10 ऑगस्ट रोजी सकाळी त्याला उपचारासाठी बाहेर काढण्याचे ठरले. परंतु वैनगंगा नदी तुडुंब भरून असल्याने बाहेर उपचारासाठी कसे न्यायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला. कुटुंबीयांनी डोंग्याची व्यवस्था करून त्याला नदी पार करून शासकीय ॲम्बुलन्स मध्ये मुल येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुल येथील डॉक्टरांनी त्याला तपासांती मृत घोषित केले. अर्थात त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली, आई वडील आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवरच नव्हे तर संपूर्ण गावात शोकळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुराने वेढलेल्या या गावात असे अनेक प्रकार घडू शकतात मात्र प्रशासन या गावाविषयी बेदखल असल्याचे पहावयास मिळत असल्याचे मत शिवसेना उप तालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी व्यक्त केले आहे. तसेच मृतकाच्या कुटुंबीयास तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.