पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ०९/०२/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे जामले प्लॉट ताडीगुत्ता चौकाजवळ असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये छुपा जुगारीचा अड्डा चालू असल्याची गोपनिय बातमी सांगून, सदर ठिकाणी छापा कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बातमीचे ठिकाणी यशस्वी छापा कारवाई करुन मटका नावाचा जुगार चालविणारे १ ) कैलास राजेंद्र बोलमट वय २४ वर्षे रा. हडपसर रेल्वे स्टेशन जवळ मुंढवा पुणे व २) अशोक सिद्राराम अंजीखाने वय ४६ वर्षे रा. साईनाथनगर वडगाव शेरी पुणे सदर यांना ताब्यात घेतले तसेच त्यांचेकडील रोख रक्कम व जुगारीची साधने असा एकूण जुगारीतील २१,०००/- रुपयांचा ऐवज जप्त करून छापा कारवाई केलेली आहे.
चालू वर्ष २०२३ मध्ये मुंढवा पोलीस ठाण्याकडून यापुर्वी गावठी हातभट्टी दारु विक्रीच्या ४ यशस्वी छापा कारवाई केलेल्या असून चोरून चालणारे जुगारीचे अड्डयांवर २ यशस्वी छापा कारवाई केलेली आहे
सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्री. बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप काकडे मुंढवा पोलीस स्टेशन यांनी पोलीस उप-निरीक्षक शिवाजी काटे, पोलीस उप निरीक्षक गजानन भोसले यांना सहा. पो. फौज, वाघ आणि पोलीस अंमलदार दत्ता जाधव यांनी केलेली आहे.

