पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-.०९.०२.२०२३ रोजी शिवणे, उत्तमनगर पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे गिळुन आल्याने १५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम, मोबाई व जुगाराचे साहित्य असा एकुण ७३,९३०/- रू किचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा १६ इसमांविरूध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १७ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप शहर, आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, अजय राणे. मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.