पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूजऑनलाईनपुणे:- आज रोजी युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत गस्त करत असताना *पो.अं. ३७०९ अशफाक मुलाणी* यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फरासखाना पो स्टे गु र नंबर 130/2022 भा.दं. वि. कलम 323, 143, 147, 148,149,427, 34 आर्म ऍक्ट 4(25) सह क्रिमिनल लॉ अमेनमेंड ॲक्ट कलम 7 मधील पाहिजे आरोपी नामे प्रसाद उर्फ भैया दादू शिरवळे हा हडपसर एस आर ए बिल्डिंग शिंदे वस्ती हडपसर* हा या ठिकाणी आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच युनिट सहाच्या पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव 1)प्रसाद उर्फ भैया दादू शिरवळे वय 21 रा.शिंदे वस्ती एस आर ए बिंल्डिंग हडपसर, पुणे* असे सांगितले तेव्हा फरासखाना पो स्टे चा गुन्हे अभिलेख पडताळून पाहता नमुद गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाली असता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील तपास कामी फरासखाना पो स्टे पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, श्री. नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.