नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण व भव्य लाभार्थी सोहळा आज संपन्न झाला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार गणपत गायकवाड आणि ज्ञानेश्वर म्हात्रे आदी उपस्थित होते.
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. योजना राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.
या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348