निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कवठाळा:- दि.१९ फेब्रुवारी ला इरई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान इरई तर्फे दि.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता इरई गावात भव्य ढोल ताशाच्या आणि भजनाच्या गजरात भव्य मिरवणूक तसेच दुपारी ४ वाजता महाप्रसाद तसेच सायंकाळी ७ वाजता मुख्य सांस्कृतिक व्याख्यानाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून हरिदास गौरकर ओ.बी.सी समन्वयक कोरपणा तालुका सुनील एस.खरवडे छत्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा एम.ए, नेट सेट (संकृत) प्रभाकर गेडाम ओ.बी.सी.समन्वयक कोरपणा सुभाषजी मसे माजी बँक मॅनेजर सीडीसीसी कावठला याच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
होणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी, महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान इरई याच्या कडून करण्यात आले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348