अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.९८२२७२४१३६
सावनेर:- संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याने, सावनेर शहर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यकर्त्यांना श्री. तुषारजी ऊमाटे महामंत्री भाजप सावनेर तालुका यांच्या तर्फे तिरंगा ध्वज चे निःशुल्क वितरण करण्यात आले.
सर्व सदस्यांना या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच तिरंगा ध्वज लावण्याची, आचार संहितेची माहिती सुद्धा देण्यात आली. सगळ्यांनी आप आपल्या घरावर हे ध्वज लावण्याची तसेच तिरंगा ध्वजाचा पूर्ण सन्मान बाळगण्याचा प्रण घेतला.
या प्रसंगी अभाविपचे सदस्य अभिषेकसिंह गहरवार, नकुल सातपुते, मनीष तपासे,शिशिर धोटे, सुमित काळे, रिशब दरवाई, सारंग दरवाई, निखिल चाके, महेश कमोने, प्राची घ्यार, साक्षी घोडकी, खुशबू मिरचे, चंदुजी काळे, नरेंद्रजी ठाकूर भाजप ओबीसी मोर्चा, न. प. अधिकारी अमोल कांबळे,मदनकर, शेषराव वाडीकर,मुन्ना धांडोले, मधू लोही.गवईजी, विकास डोंगरे, इत्यादी उपस्थित होते.