अनिल अडकीने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.९८२२७२४१३६
सावनेर, दि.11:- सावनेर तालुक्याची वाघोडा येथील रहिवासी मराठी पत्रकार संघाचे वरिष्ठ सदस्य शांताराम ढोके यांची मुलगी कु. यामिनी शांताराम ढोके, वय २५ वर्ष, यांचे आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरी दीर्घ आजाराने निधन झाले.
मयत कु. यामिनी शांताराम ढोके यांच्यावर 2 वाजताच्या सुमारास धार्मिक विधिवत वाघोडा येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे १-भाऊ, आई, वडील असा आप्तपरिवार आहे.