कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:– आज राज्यात आणि देशात आमची संस्था शासनाशी संलकित असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन अनेक पुरस्कार वाटण्याचा महापुर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा पुरस्कारावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. असा संस्था पैसे लुटण्यासाठी भारताचे मानचिन्ह असलेल्या तिरंगा, अशोस्तंभाचा सर्रास वापर करत आहे.
असेच एक प्रकरण कोल्हापूर येथून समोर येत आहे. महाराष्ट्र शासन उपक्रम अंतर्गत भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 अशा खोट्या पद्धतीने जाहीर केल्या प्रकरणी व भारतीय अशोक स्तंभचा वापर केल्याप्रकरणी संयोजक व त्यामध्ये जाहिराती मध्ये असणारे सर्व मेंबर व आयोजकांवर गुन्हा दाखल करावा यासंदर्भात महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार यांनी कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांना दिले.
कोल्हापूर येथे एक पुरस्कार सोहळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमां मध्ये “महाराष्ट्र शासन उपक्रम पर्यटन धोरण 2016 अंतर्गत, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक, मुंबई महाराष्ट्र ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023” अशा पद्धतीने सदर टीम पुरस्कार जाहीर करत आहे महाराष्ट्र शासन उपक्रम पर्यटन व सांस्कृतिक विभागाने असा कोणताही पुरस्कार जाहीर केलेला नाही तरी हा पुरस्कार कार्यक्रम थांबवण्यासाठी महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार यांनी २ फेब्रुवारी २०२३ रोजी मेलद्वारे व ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन भगवान निंबाळकर यांना निवेदन दिले होते तरीही त्यांनी कोणती कारवाई केली नाही.
६ फेब्रुवारी २०२३ रोजी हा पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम होता त्या दिवशी सुद्धा महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार यांनी दुपारी १२ वाजता जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन भगवान निंबाळकर त्यांना हे परत निवेदन दिले की तुम्ही अजून कारवाई केली नाही तर त्यांच्याकडे परत 3 तारखेला दिलेले निवेदन प्रत कुठे गहाळ झालेली त्यामुळे शेलार त्यांना परत पहिल्या दिलेल्या कॉपीची झेरॉक्स दिली व कारवाई करा बोलले त्यांनी त्या टीमचे जे संयोजक होते त्यांना बोलवलं आणि त्यांनी जे काय बोलले ते आम्हाला काय माहित नाही तरी तो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये जितके पुरस्कार विजेते होते त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यांच्या पुरस्काराच्या फ्रेम मध्ये महाराष्ट्र शासन उपक्रम पर्यटन क्रीडा सांस्कृतिक मुंबई महाराष्ट्र असा उल्लेख झालेला आहे तसेच त्यांनी भारतीय अशोक स्तंभ हे सर्व पुरस्कार विजेत्यांना दिलेले आहेत तसेच या पुरस्काराचे त्यांनी २००० ते १०००० अशी शुल्क घेतलेली आहे असे १०० ते १५० पुरस्कार त्यांनी जाहीर केले आहेत त्यामध्ये त्यांनी सर्वांना भारतीय अशोक स्तंभ प्रत्येक विजेत्यांना दिलेले आहे आणि हे कायद्याने गुन्हा आहे या सर्व सदर टीमवर गुन्हा दाखल करावा असे महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार निवेदन सातारा पोलिसांना देऊन सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला होऊन दिले काहीही कारवाई केली नाही.
अशा अवैध पुरस्कारबाबत महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार वारंवार नेहमीच निवेदन देत असते पण कसलीही कारवाई होत नाही त्यामुळे असा मला सांगावं लागत आहे की सातारा पोलीस हे निष्काळजी पणा आणि गैरजबाबदार पणे कार्य करत आहेत महाराष्ट्र शासनाच्या नावाने व भारतीय अशोक स्तंभ ही त्यांनी वापरलेला आहे व त्यांनी लोगो वापरलेला आहे पुरस्काराचा जितके १०० ते १५० पुरस्कार जाहीर केले आहे. त्या कार्यक्रमात त्या कार्यक्रमांमध्ये सर्वांना भारतीय सविंधान व अशोक स्तंभ देण्यात आली आहेत आणि पुरस्काराच्या फ्रेम मध्ये ही सगळा उल्लेख आहे ज्याप्रमाणे भाजी विकली जाते त्याप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये भारतीय अशोक स्तंभ व भारतीय संविधान विकले गेले आहे याची पूर्व कल्पना पोलीस प्रशासनाला मी दिली असताही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर असं म्हणावं लागेल की सातारा पोलीस ही गैरजबाबदार काम करत आहे तर यासाठी मी आता हे पत्र तुम्हाला पाठवत आहे तर तुम्ही या कार्यक्रमाच्या सर्व सदस्यांवर संयोजक आयोजक वर गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी. आज महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.प्रतिभाताई शेलार यांनी कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस विशेष महानिरीक्षक श्री.सुनील फुलारी यांना बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र शासन उपक्रम अंतर्गत भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 अशा खोट्या पद्धतीने जाहीर केल्या प्रकरणी व भारतीय अशोक स्तंभचा वापर केल्याप्रकरणी संयोजक व त्यामध्ये जाहिराती मध्ये असणारे सर्व मेंबर व आयोजकांवर गुन्हा दाखल करावा यासंदर्भात निवेदन दिले.
शासनाचे नाव लाऊन पैसे घेऊन असे अवैध पुरस्कार वाटणाऱ्या अशा अवैध संस्थावर शासनाने कठोर कारवाई करावी. अशा संस्था तर्फे अवैध पुरस्कार वाटण्यात येत असेल तर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि इतर विविध पुरस्काराला कवडीचीही किंमत राहणार नाही….. महालक्ष्मी आधार फौंडेशनच्या संस्था विकास प्रतिभाताई शेलार

