पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०५/०२/२०२३ रोजी पासलकर चौका जवळील अरिहंत किराणा स्टोअर समोर, बिबवेवाडी पुणे येथून फिर्यादी या त्यांचे पतीसह दुचाकीवरून त्यांचे राहते घरी येत असतांना त्यांचे पाठीमागुन आलेल्या दुचाकीवरील अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अर्धे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून तोडून फिर्यादीस धक्का देवुन भरधाव वेगाने निघुन गेला होती. सदरबाबत फिर्यादी यांनी अनोळखी चोरट्या विरुध्द बिबवेवाडी पो स्टे येथे भा.दं.वि.सं. कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव यांचे मार्गदर्शना खाली तपास पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे तपास पथकातील अमंलदार यांनी सापळा रचुन संशईत इसमावर पाळत ठेवून आरोपी नामे आसिफ सलिम पटेल, वय-३६ वर्षे, रा. आराध्यम सोसायटी. टिळेकरनगर, येवलेवाडी, पुणे यास दिनांक १०/०२/२०२३ रोजी अटक करून त्याचे अटक व पोलीस कस्टडीत. मुदतीत तपास करता आरोपीने गुन्हा करणेसाठी वापरलेली बुलेट, गुन्हा करतेवेळी अंगामध्ये परिधान केलेली कपडे व फिर्यादी यांचे जबरदस्तीने चोरून नेले १७ ग्रॅम वजनाचे अर्थ मंगळसूत्र असे एकूण २,५५,०००/- रुपये किंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी यांचेवर यापुर्वी ही गुन्हे दाखल आहेत.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत..
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती पोर्णिमा तावरे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे, पोलीस अमलदार, रविंद्र राऊत, संतोष जाधव, प्रणय पाटील, अमोल नवले, सतिष मोरे, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, अतुल महांगडे यांनी केली आहे.