मंगेश सावरकर, नागपूर मध्य प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- मस्कसाथ तबला मार्केट नागपूर येथे शिवसेना शाखेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर विश्वास ठेऊन नागपुर जिल्हात शिवसेनेचा ठाकरे गटाचा बांधणीला वेग आला आहे. त्याचमुळे मस्कसाथ तबला मार्केट नागपूर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन नागपुर जिल्हा प्रमुख शरदभाऊ सरोदे, उपजिल्हा प्रमुख मुल्ला सिंग गौर उपजिल्हा प्रमुख छोटूभाऊ राऊत तसेंच उपशहर प्रमुख सुखलाल मरोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी या तबला मार्केट शाखा प्रमुख म्हणून विशाल घोराडकर यांनी नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रविण अहिरराव, अविनाश लोखंडे, पंकज अहिरराव, रोशन पाटील सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348