Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 1, 2023
in अपघात, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 1 मार्च:- राजुरा तालुक्यातील पेलोरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू असताना मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला करत विद्यार्थांना जखमी केले आहे. त्यामुळे संपूर्ण राजुरा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वत्र उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू आहे. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या परीक्षा केंद्रावरील प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झालेत. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे पेपर सर्वत्र सुरू आहेत. त्या अनुषंगाने आज इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. ठीक आहे 11.00 ते 2.00 या कालावधीत पेपर सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वारा जवळच मधमाश्याने हल्ला चढवला त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. यात सुरज भिमनकर व तेजस मुके हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यात मोरेश्वर लांडे (शिक्षक) व दीपक उमरे हा विद्यार्थीही मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आली. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण 96 विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असताना ही घटना घडली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या नैसर्गिक घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित होत आले नाही. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख यांनी कस्टोडियन व बोर्डाला कळविली असल्याची माहिती केंद्रप्रमुख रामटेके यांनी दिली.

★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/ 7385445348

Previous Post

दिव्यांग बंधू-भगिनींनी आलापल्ली येथील शिबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा: माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

Next Post

अंमली पदार्थ विक्री करीता आलेल्या इसमास नगर रोड सेथे छापा टाकुन १२ किलो १७० ग्रॅम गांजा व इतर वस्तु असा एकुण २,६८,४००/- रू किचा मुददेमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकाळभोर परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी ठोकल्या बेडया…..

अंमली पदार्थ विक्री करीता आलेल्या इसमास नगर रोड सेथे छापा टाकुन १२ किलो १७० ग्रॅम गांजा व इतर वस्तु असा एकुण २,६८,४००/- रू किचा मुददेमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In