राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई :- जेव्हा शिवरायाच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजाना न्याय देण्यासाठी वाट बघावी लागत असेल तर हे मोठे संतापजनक आहे. महाराष्ट्र सर्वच नेते आणि पक्ष बोमलीच्या देठा पासून शिाजीराजांच्या जयजकार करत शिवाजी महाराजाचे राज्य असल्याची गर्जना करत असते. मात्र शिवरायाच्या राज्यात शिवरायांना वनवास भोगावा लागत आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचवीस फुटी अश्वारुढ पुतळय़ाची उभारणी ऐतिहासिक मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेवले स्थानकाजवळ स्थापन करण्याच्या निर्णयानंतरही तीन वर्षे काहीच घडले नाही. पुतळय़ावरून फक्त राजकारण रंगले. पुतळा तयार झाल्यानंतर रेल्वेच्या डेपोत धूळखात पडून आहे. रेल्वेचे धोरण बदलल्यामुळे या पुतळय़ाचे काय करायचे हा बिकट प्रश्न आता रेल्वे प्रशासनाला पडला आहे.
राज्यात कोणताही सरकारी कार्यक्रम असो की, राजकीय सभा असो छत्रपती शिवाजी महाराजांना यांना अभिवादन करून सुरू होते. महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्यात सर्वच पक्षांमध्ये उत्साह असतो. मात्र राजकीय हेतू सरला, की मूळ मुद्दय़ाचा आणि महाराजांचाही कसा विसर पडतो याचे ‘मूर्तिमंत’ उदाहरण मध्य रेल्वेच्या सँडहस्र्ट रोड येथील गुड्स डेपोत शिवाजी महाराज यांच्या पुतळा बघून पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या सी.एस.एम.टी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल) रेल्वे स्थानकाच्या प्लॉटफोम नंबर 18 बाहेरील रेल्वेचा परिसर ओसाड आहे. खूप मोठय़ा अशा या परिसरात मेल- एक्स्प्रेसच्या प्रवाशांना सोडण्यासाठी खासगी वाहने येतात. तेथे सीएसएमटी – कुर्ला पाचवा आणि सहावा मार्ग प्रकल्पांतर्गत प्लॉटफोम बाहेरील परिसराचे सौदर्यकरण करण्याचा निर्णय 2017 मध्ये रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेने घेतला होता. यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय झाला होता.
हा पुतळा सीएसएमटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच बसविण्याची मागणी त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी केली. पुतळा कुठे उभा करावा यावरून वाद, राजकारण रंगले. अखेर एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा पुतळा बनवण्यात आला. या कामांसाठी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या अखत्यारीत पाच जणांची समितीही स्थापन करण्यात आली. शिवरायांच्या पुतळय़ांच्या दोन प्रतिकृती बनविण्यात आल्या. यासंदर्भात दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या समितीने चर्चा केल्यानंतर महाराजांच्या पुतळय़ात बदल करण्यात आले. त्यानंतर अश्वारूढ पुतळा उभा करण्यावर शिक्कामोर्तब करून 2018 मध्ये पुतळय़ाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर काही महिन्यांतच पुतळा उभा राहिला. पुतळय़ाचे फायबरचे काम साधारण सहा ते सात महिन्यांत पूर्ण झाले आणि त्यानंतर त्याला धातूचा मुलामा देण्यात येणार होता, मात्र या अंतिम टप्प्यावर रेल्वेकडून काम थांबविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय 2017 मध्ये झाला. 2018 साली पुतळ्याचे काम सुरू झाले. हा पुतळा तयार होऊन तीन वर्षे उलटूनही सँडहस्र्ट रोड येथील पी.डी’ मेलो रस्त्यालगत रेल्वेच्या बंद शेडमध्ये धूळखात पडून आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा या पुतळय़ाचा चौथरा दहा ते बारा फुटांचा करण्याचे नियोजन होते. त्यामुळे पुतळय़ाची उंची जवळपास 20 ते 25 फूट वाढणार होती. चौथऱ्यावर शिवरायांचे जीवनचरित्र उलगडणारे प्रसंग साकारण्यात येणार होते. पुतळ्यासाठी एक कोटी रुपये खर्च झाला.
रेल्वे धोरणानुसार पुतळा धूळखात.
निर्णय मागे? रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या सध्याच्या धोरणानुसार, प्रतिष्ठित व्यक्तींचे पुतळे, फलक, स्मारके आणि भित्तीचित्रे बसवण्यासाठी रेल्वे परिसर योग्य जागा मानली जात नाही. त्यामुळे पुतळे उभारू नयेत असे धोरण निश्चित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार झाल्यानंतर हे धोरण तयार करण्यात आले. त्यामुळे महाराजांचा पुतळा उभारणीचा निर्णय मागे पडला. आता या पुतळय़ाचे काय करावे, असा प्रश्न रेल्वेलाही पडला आहे.