पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर..
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :–मा. श्री. विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी मोटार सायकलचे गुन्हे उघड करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे ज्यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री. संतोष पाटील, पोउपनि, सचिन चव्हाण व तपास पथक अमलदार यांना मोटार सायकलचे गुन्हे उपडे करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील हे सोबतचे तपास पथकासह पेट्रोलींग करीत असताना पोशि स्वप्निल लोखंडे यांना विश्वासु बातमी मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल विक्रीकरीता पाथपिर चौक, काळेवाडी पुणे येथे येणार आहे अशी बातमी मिळालेने, तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचुन थांबलो असता तेथे एक इसम मोटार सायकलवर येवून दाबला त्याची हालचाल संशयीत वाटल्याने त्यास पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याने स्वतःचे नाव दादासाहेब ऊर्फ अनिकेत बालू निकाळजे वय २६ वर्ष रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सुकटा, ता.भूम जि. उस्मानाबाद असे सांगीतले त्याचे ताब्यातील यामाहा एफझेड मोटार सायकल नं. एमएच. १४. एफझेड.७७०३ बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यास पोलीस स्टेशन येथे आणून विश्वासात घेवून चौकशी केली असता यामाहा एफझेड मोटार सायकल चोरी केली होती असे सांगीतले त्यामुळे वाकड पोलीस स्टेशनचे अभिलेख तपासले असता वाकड पोलीस स्टेशन गु.नि.नं. १५/२०२३ भाविक ३७९ अन्वये दाखल असलेची माहीती मिळाली असलेने सदर गुन्हयात आरोपीस अटक करणेत आली आहे. आरोपीकडे झाले तपासात त्याने दाखल गुन्हयाव्यतिरीक्त आणखी दोन मोटार सायकल चोरी केलेचे कबुल केले असून त्याचेकडुन मोटार सायकली जप्त करणंत आले आहेत. सदर आरोपीकडून एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४. मोटार सायकली जप्त करणेत आले असून त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) वाकड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. १५/२०२३ भादविक २७९
२) वाकड पोलीस स्टेशन गुरजि.नं. ८५७/२०२२ भाविक ३७९
३) वाकड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. २९८/२०२३ भादविक ३७९
४) वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १०९३ / २०२२ भाविक ३७९
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे साो, अपर पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो पोलीस उप आयुक्त परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हेरे, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोहवा. अतिश जाधव, पोना. प्रशांत गिलवीले, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. विनायक धागे, पोको अजय फलने, पोशितात्या शिंदे, पोशि भास्कर भारती यांनी मिळून केली आहे. पोशि, कौलंय खराडे, पो.कॉ.अजय फल्ले,पो. शि. तात्या शिंदे,पो. शि. भास्कर भारती यांनी मिळुन केली आहे…