पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:-तळेगाव दाभाडे येथून २ लाख रुपये किमतीचे अफिन जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. ४) दुपारी शिक्षक सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई केली. या कारवाईत २५ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.
दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला तळेगाव दाभाडे शहरातील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा एकजण अफिम विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ५ हजार ६०० रुपयांचे ५१४ ग्रॅम अफिन, १४ हजारांचा मोबाईल फोन आणि ५५ हजारांची दुचाकी असा एकूण २ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
तर दिनेश याने अफिम त्याच्या गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) यांच्याकडून आणला होता. हा अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, गणेश जवडवाद वरीष्ठ पोलिस निरीक्षक तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन याच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरिक्षक संदेश इंगळे व पथकाने केली आहे..