राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिंपरी :- सतत मुसळधार पाऊस सुरू होता, नदी नाले भरून वाहत होते. गावात पूरजन्य परस्थिती. जाण्यायेण्याच्या मार्ग बंद झाल्या मुळे जील्हाशी संपर्क तुटला. त्यात एका गर्भवती महिलेची प्रसूतीची तारीख भरली त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. पूर व मार्ग बंद असल्याने आता काय करावे हा प्रश्न आला उपस्थित राहिला. शेवटी जीव संकटात घालून गर्भवती महिलेला रुग्णालय न्यायचं ठरलं. मग आशा वर्करने पण सबोतीला यायला तयार झाल्या मग डोंग्याने प्रवास केला. तालुक्यातील वेडगाव ते सकमूर या मार्गावरून पावसाच्या यातना दाखविणारा हा प्रकार समोर आला.
गोंडपिपरी तालुक्यातील नवीन पोडसा येथील पिंकुताई सुनील सातपूते या गर्भवती होत्या.त्यांना प्रसुतीसाठी गोंडपिपरीतील ग्रामीण रूग्णालयात दाखल व्हायचे होते. पण तिन दिवसांपासून सततधार पाउस सुरू होता. गोंडपिपरीला जाण्याचे सर्वच मार्ग बंद होते. वेडगाव ते सकमुर या मार्गाला नदीबेटाचा स्वरूप आले. अशा स्थितीत सातपूते कुटुंबियांना मोठीच चिंता सतावू लागली. गावातील आशा वर्कर व आरोग्य सेविका यांच्या मार्गदर्शनात पिंकुताईला आरोेग्य मार्गदर्शन सुरू होते. पण आज कुठल्याही स्थितीत तिला गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात भरती होणे आवश्यक होते. मार्गाला नदीबेटाचा स्वरूप आलेले अशा स्थितीत काय करावे हा प्रश्न होता. कुणी डोंगा चालवायला तयार नव्हते.महिलेची अवस्था व गंभीरता लक्षात घेता शेवटी एक नावाडी तयार झाला. यानंतर सुरू झाला नदीबेटावरील जिव धोक्यात घालणारा प्रवास. पिंकुताई सातपुते यांच्यासह आशा वर्कर संगीता ठाकूर व कुटुबातील सदस्यांना घेत डोंगा निघाला. वेडगाव ते सकमुरच्या समोर पर्यत डोंग्याने प्रवास करित त्या शेवटी गोंडपिपरीला पोहचल्या. डोंग्याने जिवघेणा प्रवास करून गरोदर महिला गोंडपिपरीला येथील रुग्णालयात पोहचल्याची माहिती मिळाली त्यावेळी कुटुंबियांनी समाधानाचा सुस्कारा सोेडला.
वेडगावच्या आरोग्य सेविका मिनाताई टिकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. वेडगावच्या आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारा सिमावर्ती भागातील वेडगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. पण अनेक वर्षापासून इथे वैद्यकीय अधिकारी नाही. कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने याठिकाणी प्राथमिक उपचार मिळणे कठीण आहे. ही बाब माहित असतांनाही लोकप्रतिनीधींनी या महत्वाच्या समस्याकडे वारंवार दुर्लक्षच केले आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे. त्यामुळे आता तरी वेडगावच्या आरोग्य उप केंद्रात आरोग्य सुधारा अशी मागणी नागरिक करीत आहे.