🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
हिंगणघाट:- तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पैशाच्या घेवाणदेवाण साठी वाद झाल्याने एका व्यक्तीच्या डोक्यावर काठीने तसेच दगडाने जबर मारहाण करुन त्याची हत्या करण्यात असल्याची घटना दीं. 12 रोजी रात्री 8.20 वाजताच्या सुमारास येणोरा परिसरात असलेल्या माता मंदिरा जवळील जयसिंग चंदेल यांच्या शेतातील बंड्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दी.13 रोजी आरोपीस बेड्या ठोकून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती दिली. संतोष जयसिंग चंदेल वय 44 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर राजू शंकर धात्रक रा. सातेफळ रोड हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची मदत करणाऱ्या 17 वर्षीय बालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
आरोपी राजू शंकर धात्रक याने मृतक संतोष चंदेल याचे शेत मक्त्याने घेतले होते. त्यामुळे दोघांत मक्त्याच्या पैशातून दोघांत वाद झाला. अखेर संतापलेल्या राजूने अल्पवयीन मुलाच्या मदतीने संतोषच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार केला. तसेच त्याच्या डोक्यावर दगडानेदेखील जबर मारहाण केली. यात संतोषचा जागीच मृत्यू झाला.
संतोषला ठेवून आरोपींनी तेथून पळ काढला. ही बाब शेत मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. मृतक संतोषची पत्नी ममता चंदेल यांनी याबाबतची तक्रार दाखल केली.
गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, आशिष मेश्राम यांचे पथक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात आरोपींच्या अवघ्या 24 तासांत आरोपी राजू धात्रक यास अटक करुन अल्पवयीन मुलास ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.