सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनी देशातील वाढत्या महागाई बेरोजगारी तसेच विविध प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने बल्लारपूरचे तहसिलदार यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले.
देशातील मोठ्या प्रमाणात वाढत असलेली महागाई मुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे गतीबाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. युवा तरुण आज रोजगार नसल्यामुळे बेरोजगार झाले आहे. या बेरोजगारीमुळे अनेक तरुणाचे भवितव्य बर्बाद झाले आहे. सरकारने पोकळ आश्वासने देऊन सत्तेवर आले पण ते आश्वासने पाळली नाही. त्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि सरकार मुखदर्शक बनून बघत आहे. असे विविध प्रश्न घेऊन आज वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आली त्यानंतर बल्लारपूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला आघाडी, जिल्हा सल्लागार सत्यभामाताई भाले, महिला उपाध्यक्षा शालिनीताई वावरे, उपाध्यक्षा आशाताई भाले वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ओम रायपुरे, शहर महासचिव उमेश ज.कडू, महासचिव सतिश नगराळे, सचिव प्रभुदास देवगडे, गौतम रामटेके, शुभम नागापुरे, प्रकाश तावाडे, पराग जांभुडकर, प्रियंकेश शिंगडे, शाखा अध्यक्षा दिपा नरेश सहारे, हनिशा प्रविन दुधे, एन.के. गायकवाड, नरेश सहारे, प्रनय नागापुरे, रत्नमाला नरांजने, इंदुताई खरतड, वत्सलाबाई तेलंग, अंगुलीमाल वाघमारे, कविताताई, उज्वलताई नगराळे, किरण रामटेके, प्रज्ञा नमनकर, सविता मानकर, रेखाताई पागडे, शालुताई चांदेकर सह शेकडो नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.