श्याम भुतडा बीड प्रतिनिधी
बीड:- जिल्हातून एक भीषण अपघात झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्हात शोककळा पसरली आहे. पाटोदा येथील पाटोदा- मांजरसुबा महामार्गावर बामदळे वस्तीवर 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारमधील सहा जण जागीच ठार झाले. लग्न समारंभासाठी हा परिवार पुण्याला जात होता. मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
जीवाचीवाडी (ता. केज) येथील रामहरी चिंतामण कुटे यांचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी पुण्याला जात होते. बामदळे वस्तीवर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जण ठार झाले आहे. टेम्पोच्या खाली कार घुसली होती ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मृतांत दोन लहान मुलाचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार व सहकाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या घटनेने लग्न समारंभ व जीवाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.