अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर/सावनेर:- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशावरून रातूम नागपूर विद्यापीठातील अनेक अभ्यास मंडळाद्वारे कौशल्य विकासाला अनुसरून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले होते. यातुन प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ नये याकरिता धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सिंधू महाविद्यालय नागपूर, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर येथील वनस्पतीशास्त्र विभाग आणि आयुर्वन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था,”रामेती” नागपूर येथे पार पडलेल्या “फार्म्याकोगनोसी अँड हर्बल टेक्नॉलॉजी” या विषयावरील कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.अखिलेश पेशवे यांनी भूषविले तर प्रा. डॉ. नितीन डोंगरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रकाश इटणकर यांनी उपरोक्त विषयावर त्यांच्या बिजभाषनातून सविस्त्तर मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. व्ही. एम. पेंडसे, प्राचार्य डॉ. पराग निमिशे आणि अंबारीश घटाटे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याचे आव्हान असेल असे उपस्थित मान्यवरांनी प्रतिपादन केले. श्री आयुर्वेद महाविद्यालय येथील डॉ. रामण बेलगे, डॉ. श्यामबाला केंद्रे आणि डॉ.चंचल भावसार यांनी अनेक प्रात्यक्षिकांसह उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षण दिले.
या प्रसंगी औषधी वनस्पती प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले होते. प्रास्ताविक, कार्यशाळेचे संयोजक प्रा.डॉ. विलास डोईफोडे यांनी केले. तर संचालन, आयोजन- सचिव प्रा.डॉ. राजकुमार खापेकर यांनी आणि आभार प्रदर्शन समन्वयक प्रा.डॉ. पितांबर हुमणे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.संदीप हाते, प्रा. चंद्रशेखर पोटोडे, प्रा.डॉ.मेघा भांबरी, प्रा. प्रवीण दुलारे, प्रा.डॉ.प्राची लांबट यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी विद्यापीठ क्षेत्रातील अनेक वनस्पतीशास्त्र प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आणि वेळोवेळी अशा प्रात्यक्षिक पूरक आयोजनाची इच्छा व्यक्त केली.