प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जुन्या पेन्शन योजने संदर्भात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यांमध्ये पुकारलेल्या संपात विदर्भ तलाठी संघ नागपूर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेले नव्हते, तरी संघटनेतर्फे दिनांक 12 मार्च रोजी विदर्भातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून सर्व जिल्हाध्यक्ष/सचिव,केंद्रिय पदाधिकारी यांनी मते मांडली. मांडण्यात आलेल्या सर्व मतांचा आदर करुन विदर्भ पटवारी संघ नागपुर यांनी शासनास आंदोलनाची नोटीस दिनांक 13 मार्च रोजी देऊन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या तलाठी/मंडळ अधिकारी संवर्गासह ईतर सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना पुर्ववत दि.19 मार्च 2023 पर्यंत लागु करणेबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यव्यापी संपाला पाठींबा म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपुर सक्रिय सहभाग नोंदविल अशी नोटीस दिलेली होती.
परंतु शासनातर्फे अद्याप कोणतेही मागण्या निकाली न लागल्यामुळे दि.20 मार्च 2023 पासुन विदर्भ तलाठी संघ नागपूर -2 बेमुदत सामुहिक रजा आंदोलन पुकारत संपात सक्रिय सहभाग घेत आहे. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे