राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथे जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी विविध विभागातील कर्मचार्यांच्या बेमुदत संप सुरू आहे या संपात शिक्षक सूद्धा सहभागी झाल्याणे शाळा ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे शिक्षकच शाळेत येत नसल्याने व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षण विभागाने संप काळात सूद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता शिक्षण विभागाने संबंधित अधीकार्याना शाळा सुरु ठेवण्याचे परीपत्रक निर्गमित केले आहे यानुसार गोंडपिपरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी संप काळात सूद्धा शाळा सुरु ठेवण्यात यावे या करीता शाळा व्यवस्थापण समितीला आदेश दिले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सूरु झाले त्या मुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यव्यापी संप दिनांक 14/3/2023 पासून सुरु झालेला असून या कालावधीत नियमित शाळा सुरु ठेवण्यासाठी मा गटविकास अधिकारी गोंडपिपरी यांच्या पत्र क्रं 1 सूचणे नूसार त्यादृष्टीने उपरोक्त संप काळात आपल्या गावातील शाळा नियमित सुरू ठेवण्याकरिता ग्राम पंचायत डोंगरगाव येथील शाळा समिती सरपंच सौ मंगला झाडे, अध्यक्ष कवडू लोहट, सदस्य राजेंद्र झाडे, सदस्य ग्राम पंचायत महेश मडावी, उपसरपंच नीलकंठ भाऊ लखमापूरे तसेच गावातील काही सुशीक्षीत विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील वर्ग सूरु करुन विद्यार्थ्यांना शिकवीण्यात येत आहे शिक्षक संपावर असून सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन नियमित शाळा सुरु केली आहे