नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- प. ह. श्री.पुंडलिक बाबा जन्मोत्सव व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरन सोहळा निमित्त भव्य राज्यस्तरीय खुली खंजरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मु. पो. आयता तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथे दिनांक. 25 मार्च शनिवार ला आयोजित करण्यात आलेली आहे.
भजन क्षेत्रात महाराष्ट्र स्तरावर सर्वाधिक पसंतीची ठरलेली खंजरी भजन स्पर्धा यंदा राज्यस्तरीय पातळीवर आयोजित करण्यात आली आहे. आयता येथे 25 मार्च रोजी या खंजरी स्पर्धेने संपूर्ण यवतमाळ जिल्हातील भाव भक्ती श्रद्धा साठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.
तरी सर्व गुरुदेव प्रेमींनी या स्पर्धेत भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी. विनीत नवयुवक गुरुदेव सेवा भजनी मंडळ व समस्थ ग्रामवासी आयता. स्पर्धेचे आकर्षक बक्षिसे: 1) 11,000 2) 10,000. 3) 9,000 4) 8,000 5) 7,000 6) 6,000. 7) 5,000 8) 4,000. 9) 3,000. 10) 2,500 11) 1,500. 12) 1,000 ही स्पर्धेची आकर्षक बक्षिसे आहे. श्री श्यामभाऊ मादेश्वर मो. नं. 9405160953 , अधिक माहितीसाठी या नम्बर वर संपर्क साधावा अशी आयता ग्रामवशी यांनी म्हंटले आहे.

