प्रशांत जगताप, मुख्यसंपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भूम:- माजी सैनिक आणि दलित महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून अपमानितपणाची वागणूक दिल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी आणि संबंधितावर कार्यवाही करावी या मागणीसाठी सौ. मीना दिलीप ओव्हाळ या उपविभागीय कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषणास बसल्या होत्या. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलनं मागे घेतले.
अधिक माहिती की, बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी पासून भूम उपविभागीय कार्यालया समोर माजी सैनिक पत्नी व दलित महिला सौ.मिना दिलीप ओव्हाळ रा. आंद्रूड तालुका भूम या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसल्या होत्या. या संदर्भाने उपोषणार्थी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, आंद्रूड ग्रामपंचायत सरपंच यांनी अश्लीलपणाचा खोटा आरोप करून ग्रामपंचायतला ठराव घेऊन शासनाकडे पाठवून गावात राहणे मुश्किल केले आहे, तर सरपंच पती यांनी देखील पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वाशी पोलिसात कलम 395 नुसार खोटा गुन्हा दाखल केला आहे , या संदर्भाने उपविभागीय पोलिस अधिकारी भूम यांचेकडे दाद मागितले असता त्यांनी देखील प्रकरणात दखल घेतली नाही, उलट भूम परंडा वाशी तालुक्यात बेकायदेशीर धंदे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू आहेत.
पर्यायाने आंद्रड ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी खोटा ठराव घेऊन खोटा आरोप केल्याप्रकरणी, सरपंच पती यांनी खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी, खूप परांडा वाशी तालुक्यात बेकायदेशीर धंदे चालू असल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी व न्याय द्यावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू केले होते. या उपोषणार्थी यांनी मागण्याचे निवेदन वरिष्ठांना पाठवले होते.
त्यामुळे दिनांक 17 मार्च ला प्रशासनाने उपोषणकर्त्या सौ.मिना दिलीप ओव्हाळ यांना लिखित स्वरूपात कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष भागवत शिंदे, भाजपा चे शहर अध्यक्ष शंकर पुणेकर सह शेकडो नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपोषणकर्त्या सौ.मिना दिलीप ओव्हाळ यांनी महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या की, प्रशासनाने लेखी आश्वासन दिले त्यामुळे हे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. पण आरोपीवर कारवाई नाही झाली तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येणार यांची प्रशासनाने नोद घ्यावी.