संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- गोंडवाना गणतंत्र पार्टीचा महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाला समर्थन देण्यात आले असून कर्मचारी अनेक आंदोलने केली असून शासन त्यांच्या मागणीकडे दर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव टोकाची भूमिका घ्यावी लागत आहे यामुळे राज्याच्या कर्मचारी बांधवाना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी जेणेकरून निवृत्ती झाल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह होण्यास हातभार लागेल मिळणाऱ्या पेन्शन मधून गरगरीब व छोट्या व्यावसायिकांना रोजगार मिळेल मिळणार रा पेन्शन ही वस्तू खरेदीत व आरोग्यास व इतर कामात खर्च होत असल्याने यामुळे देशाच्या आर्थिक विकासात बळ मिळेल असेही निवेदनात नमूद केले असून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महिपाल मडावी, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा राजुरा विधान सभा प्रमुख घनश्याम मेश्राम यांनी तहसिलदार राजुरा मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन नायब तहसिलदार यांनी स्वीकारले आहे.