प. पु. श्री माधव महाराज यांच्या वाणीतून श्री राम कथा व प्रवचन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालक्यातील कमलापुर येथे एकल अभियान संस्कार शिक्षा च्या वतीने श्री राम नवमी निमित्त दिनांक २३,२४ व २५ मार्च ला तीन दिवसीय श्री राम कथा हनुमान मंदिरा च्या आवारात आयोजन करण्यात आले आहे.
वनबंधू परिषद मुंबई द्वारा संचालित एकल विद्यालय अभियान अंतर्गत संस्कार शिक्षा, श्रीहरी सत्संग समिती च्या वतीने प्रथमच कमलापूर् येथे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या जन्म सोहळ्या निमित्याने श्री राम कथा व प्रवचन सोहळा कथाकार परमपूज्य श्री माधव महाराज यांच्या गोड वाणीतून आयोजन करण्यात येत आहे तरी तीन दिवस सायं ७ ते रात्री १० वाजे पर्यंत होणाऱ्या श्री राम कथा व प्रवचन सोहळा कमलापुर आणि परिसरातील समस्त भक्तगणानी कार्यक्रमात उपस्थित राहून श्रवण करण्याचे आवाहन कमलापुर संच समिती अध्यक्ष श्रीधर दुग्गीराला पाठी, सचिव हरीश पब्बावार, उपाध्यक्ष दिवाकर कोडापे, अभियान प्रमुख नरेश गड्डमवार, प्रशिक्षण प्रमुख संजू चौधरी, संच प्रमुख कोमरया तलांडी व आयोजन समितीने केले आहे.