सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम :- जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. दरवर्षी यात्रेकरीत राज्यातुन तसेच देशभरातून लाखो बंजारा भाविक येत असतात. भाविक आपला नवस फडण्या करिता बोकड बळी देत असतात परंतु न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जगदंबा देवीच्या मंदिरा समोर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे. बोकड बळी प्रथेवरील बंदीमुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुख्य मंदिराचे मंडप व त्या लगतच्या 200 मीटर यात्रा परिसरात परिस्थिती हाताळण्याकरिता 31 मार्च पर्यंत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे.

