निलेश पत्रकार, प्रतिनिधी
यवतमाळ:- 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी यवमाळ येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घरकुल मिळण्यासाठी प्रशासनाला वारंमवार पाठपुरावा करून सतत दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ध्वारोहणाचा दिवशी आत्मदाहनाचा प्रयत्न केला.
यवतमाळ शहरात 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची लगबग सुरू होती. सर्वीकडे उत्साहाचे वातावरण होते. त्यात एक महिला नाव शांता बनसोड या यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येथून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होती. पण, शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी समय सूचकता दाखवल्याने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शांता बनसोड असे महिलेचे नाव आहे. महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे. घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्या सोबत पेट्रोल होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.