सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- बीजेपी नेते आणि वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सदैव गरजू गरीबांना मदत करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील लोक नेता असे संबोधले जाते. असच एका कार्यामुळे त्याचे सर्वीकडे कौतुक करण्यात येत आहे.
बल्लारपुर शहरतील गौरक्षण वार्ड येते राहणाऱ्या प्रनिता श्याम पवार या विधवा महिलेचा पती काही दिवसा पूर्वी एक घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसात कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान कोरोना व्हायरस मुळे सासू आणि सासरे याचे पण निधन झाले. एकाच परिवारातील तीन लोकाचे असे अकस्मात निधन झाल्याने आणि परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ही विधवा महिला जीवन जगण्यासाठी धळपळत होती.
या गरीब महिलेचे दुःख समजून घेऊन वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तिला जीवन जगण्यासाठी एक सिलाई मशीन दिली. त्यामुळे ती लोकांचे कापड शिवून आपल्या परीवाराचे भरण पोषण करेल.
एका विधवा महिलेला मदत करून मानवधर्म निभवणारे महाराष्ट्राचे कैबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याचे अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाजपाचे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महाराष्ट्र वन विकास महामंडळचे पूर्व अध्यक्ष वरिष्ठ मार्गदर्शक नेते चंदन सिंह चंदेल यांच्या हस्ते प्रनिता पवार यांना सिलाई मशीन देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेता निलेशभाऊ खरवड़े, महामंत्री मनीष पांडे, समीर केने, उपाध्यक्ष राजेश दाशरवार, युवा मोर्चा अध्यक्ष एडवोकेट रनंजय सिंह, शहर सचिव सतीश कनकम, श्रीनिवास कनदकुरी, ओम प्रकाश प्रसाद, मिथिलेश खेंगर, सुरेंद्र सिंह खड़का, बबलू गुप्ता, अरविंद वर्मा, प्रकाश गजपूरे, सचिन उमरे व अनेक नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.